Skip to main content

जोरात उठते कळ....

लेखक अधिराज यांनी बुधवार, 13/02/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आतल्या आत ढवळतं आणि ज्जोरात उठते कळ पण तिच्या मते आजकाल मला लागलाय कवी चळ.. मग, ती समोर असली की करतो थोडी वळवळ आतली वेदना लपविण्यासाठी आणतो उसनं बळ.. पण, ती ही अशी चलाख गाठतेच माझ्या मनाचा तळ म्हणते, बस्स झालं तुझं नाटक नाहीतर मी काढीन इथून पळ.. माझे उर्मी दाबून ठेवण्याचे प्रयत्न होतात निष्फळ तिच्या ओरडण्याने भानावर येतो पण जखम वाहत राहते भळभळ.. अरे, कविता म्हणजे नसते प्रत्येकाच्या हातचा मळ उगाच लिहावसं वाटलं म्हणून सोडायचे शब्दांचे नळ.. काही कामधंदा करू नको नुसत्याच भावना दळ हा रोग जडलाय तुला पण होतोय माझा छळ.. पण मी आता कोडगा होतोय ऐकून सोडून देतो सरळ पुन्हा आतमध्ये ढवळलं की शब्दांचीच ओकतो गरळ..

वाचने 2062
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by श्रिया

श्रियाजी तुम्ही दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद! ती तशी मनानी चांगली आहे हो, पण तिला माझ्या कविताच आवडत नाहित.

In reply to by परिकथेतील राजकुमार

राजकुमार सर ,त्या,निमित्ताने का होइना, तुम्ही आमच्या यातना वाचल्या, हे आमचे अहोभाग्यच!

In reply to by नाना चेंगट

आवं चेंगटांचे नाना, आधी लोकांना आमची वेदना तर कळू द्या, मग बघता येइल इडंबनाचं.

मॅमनो की मॅमोग्राफी का काय ते करुन घ्या उगाच कळ उथते म्हणुन सोडुन नका देवु

In reply to by इरसाल

अहो, नवकवीला येणार्‍या कळा वेगळ्याच असतात हो, कुठून सुरु होतात तेच कळत नाही कधीकधी.

In reply to by बॅटमॅन

सर एकदम बरोबर, ढगाला कळ लागली कि ढग बरसतात, आम्हाला कळ लागली कि शब्द बरसतात.

In reply to by सूड

सूड सर, वडिलधार्‍या माणसांचा एकेरी उल्लेख करण्याची रीत नाही हो माझी. म्हणून सर म्हणतो इतकेच.
मिपावरचे एक जुने 'स्नेही' आठवले.
कोण हो कोण? आता कुठे असतात ते.

In reply to by खबो जाप

खबो शेट जावा तिकडे, परसाकडे गरळ ओकायला नसतं जायचं काही. आणि शब्दांची गरळ रसिकांवरच टाकायची असते बाबा.

In reply to by अधिराज

आहो तुमचे म्हणणे बरोबर आहे हो पण निसर्गाच्या हाकेची कळ पहिला शांत करा (खळखळून) मग शब्दांची गरळ(भडभडून) रसिकांवर टाकताना तुम्हाला आणि रसिकांना ज्यास्त मजा येईल...