Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जयवी on Tue, 02/12/2013 - 11:57
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर

Submitted by चाणक्य on Tue, 02/12/2013 - 14:52

Permalink

तरही?

तरही गझल म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 02/12/2013 - 15:18

Permalink

तरही गझल म्हणजे एक कुठला तरी

तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल. ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 02/12/2013 - 16:54

Permalink

सुरेख

सुरेख रचना:
जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
व्वाह!
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Tue, 02/12/2013 - 17:02

Permalink

रडगाणे दादायचा मुड नसल्याने पास देणार होतो, पण...

राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
ही ओळ मस्तच वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Tue, 02/12/2013 - 20:59

Permalink

अरे वा ! मस्तं

अरे वा ! मस्तं
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Wed, 02/13/2013 - 09:39

Permalink

मनापासून धन्यवाद

मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/14/2013 - 20:10

Permalink

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना

जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले अप्रतिम !
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on गुरुवार, 02/14/2013 - 21:25

Permalink

आवडली गझल. 'आयुष्य राजयोगी'

आवडली गझल. 'आयुष्य राजयोगी' खासच!
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Fri, 02/15/2013 - 15:38

Permalink

मनापासून धन्यवाद

मनापासून धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Fri, 02/15/2013 - 16:38

Permalink

बहोत बढिया...!

बहोत बढिया...!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Fri, 02/15/2013 - 17:40

Permalink

लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस

लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले | दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-) ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2700 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com