सुखाच्या घडीला निभावू कसे
निळ्या आसमंती शशीचे हसे
नसे स्वप्न हे नाही आभासही
मिटे पापणी ना असे हे पिसे
स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले
आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे
ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी
कोण गाथा रुधीरास सांगते भले ?
..........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1344
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुठुन आणता हो शब्द? की ते
सलाम........................
सत्य आणि आभास या दोहोंच्या
सर्वांचे मनापासून आभार.
In reply to सत्य आणि आभास या दोहोंच्या by इन्दुसुता
आवडले हे शब्दांचे खेळ....