Skip to main content

पिसे

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 27/12/2012 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या घडीला निभावू कसे निळ्या आसमंती शशीचे हसे नसे स्वप्न हे नाही आभासही मिटे पापणी ना असे हे पिसे स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी कोण गाथा रुधीरास सांगते भले ? ..........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1348
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

सत्य आणि आभास या दोहोंच्या मधे, मनात एक परिसर असतो, तुमची कविता तेथे घेऊन गेली. आवडली हेवेसांनल

In reply to by इन्दुसुता

सर्वांचे मनापासून आभार. इंदुसुता, मी जे मांडलंय ते नेमकं समजलंय तुम्हाला. मला अतिशय आनंद वाटला आपला प्रतिसाद वाचून. मला ह्या सत्य आणि आभास मधल्या परिसरात वावरायला खूप आवडतं. तुम्हला ती जागा गवसली आणि आवडली याचं समाधान वाटलं. अशा जागांचे नेमके पत्ते सांगता येत नसतात. ते ज्याचे त्याला सापडत असतात असं मला नेहमीच वाटत आलंय त्याची ही प्रचिती आहे असं मी समजतो. :-)