आता तरी देवा,
आता तरी देवा आम्हा पावशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
दिवसेंदिवस हि वाढतच जाई |
जगामध्ये हिला कोणी रोखणारा नाही |
तू तरी हिला आता रोखशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
गरीब श्रीमंतातली दरी वाढतच जाई |
पुढारी खिसे भरण्यात मग्न होई |
याच्यासाठी काहीतरी करशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
पैसेवाले रोज करतात मजा |
गरिबांसाठी संसार, आहे एक सजा |
गरीबांचा वाली तू होशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
रोज होत आहे नवीन घोटाळे |
गरिबांचे निघते आहे रोज दिवाळे |
त्यांच्यासाठी रोज दिवाळी आणशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
महागाईचा असा चालला आहे खेळ |
खर्चाचा नि पगाराचा बसेना वो मेळ |
ताळमेळ घडवून तू आणशील का?
महागाईला आळा तू घालशील का?
अप्रतिम, कविता सद्ध्या
धन्यवाद, शिवप्रसाद