✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पांडुरंग पांडुरंग

क — कौस्तुभ आपटे, Sun, 12/09/2012 - 11:05
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तुच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... तुझ्या कल्पनेने जीव उताविळ होतो दश इंद्रियांनी देह मोहरून गातो "पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग" विनवितो तुला तुझ्या चाकरीत घे रे॥२॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... भक्तिगीत --कौस्तुभ http://www.facebook.com/AseSphuraveGeet

प्रतिक्रिया द्या
2022 वाचन

💬 प्रतिसाद (10)

घाल घाल पिंगा वार्‍या ची चाल

स्पंदना
Sun, 12/09/2012 - 11:13 नवीन
घाल घाल पिंगा वार्‍या ची चाल अगदी परफेक्ट बसते या कवितेला. मी म्हणुन पण बघितली.
  • Log in or register to post comments

अत्ता घाइ घाइत,फक्त कविता

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/09/2012 - 12:11 नवीन
अत्ता घाइ घाइत,फक्त कविता अवडली एवढीच प्रतिक्रीया देतो. :-)
  • Log in or register to post comments

आत्मा साहेब कवीता नाही ती

श्री गावसेना प्रमुख
Sun, 12/09/2012 - 15:35 नवीन
आत्मा साहेब कवीता नाही ती भक्तीगीत आहे, एव्हढे घाइ करुनशान कुठ निघाले व्हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त छान जमले आहे भक्ती गीत.

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/09/2012 - 15:54 नवीन
मस्त छान जमले आहे भक्ती गीत. पांडुरंग ऐवजी पंडुरंगा चालले असते का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

गलती से मिस्टेक हो गया...

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/09/2012 - 15:55 नवीन
पंडुरंगा ऐवजी पांडुरंगा असे वाचावे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

भक्तीगीत छान लिहिलंय. वृत्तात

हारुन शेख
Sun, 12/09/2012 - 15:58 नवीन
भक्तीगीत छान लिहिलंय. वृत्तात बसते कि नाही काय माहित पण ' पांडुरंग ' मधल्या 'ग' ला काना देऊन 'गा' केले की तो अजून जवळ आल्यासारखे वाटते. बाकी तो विठोबा आपणावर लवकर प्रसन्न होऊन आपल्यास दर्शन देवो ही प्रार्थना.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

कौस्तुभ आपटे
Tue, 12/11/2012 - 14:36 नवीन
धन्यवाद! पांडुरंग च्या ग वर जर जोर दिला तर ते व्यवस्थीत वाटत. अभिप्राया वद्द्ल मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर गीत ..

गणेशा
Tue, 12/11/2012 - 19:20 नवीन
अतिशय सुंदर गीत .. आवडले एकदम.. अवांतर : बाकी ओळखले असशीलच..
  • Log in or register to post comments

धन्यवाद मीत्रा गणेश !

कौस्तुभ आपटे
Wed, 12/12/2012 - 00:33 नवीन
धन्यवाद मीत्रा गणेश ! कसा आहेस!....चार वर्ष झाली तुला भेटून....स्वरनक्षत्र :)
  • Log in or register to post comments

छान आहे

अनिल तापकीर
गुरुवार, 12/13/2012 - 10:04 नवीन
छान आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा