चित्र उपलब्ध नाही
पानावरच्या दवबिंदूपरी
सजते, निसटुनिया विरते
ऊन - सावली नाते अपुले
कधी हसते अन् कधी रुसते
कधी हिरवाईच्या मखमाली
भिरभिरते अन् बागडते
कधी काहिली, कधी होरपळ
कधी पेटुनी धगधगते
कधी पौर्णिमेच्या चंद्रापरी
चमचमते अन् लखलखते
कधी गर्द अवसेच्या राती
काळोखातुन पाझरते
लडीवाळ कधी मोरपिसापरी
हळुच कानी कुजबुजते
कधी अनावर प्रपातापरी
दुमदुमते अन् कोसळते
कधी मौनाच्या बंद क्षणांनी
हिरमुसते अन् मुसमुसते
कधी शब्दांच्या पागोळ्यातुन
गहिवरते अन् रिमझिमते
विरहाच्या एकांती नाते
उष्ण आसवांनी भिजते
गंध मोगर्या मीलन राती
फुलून गात्री दरवळते
नात्याची ही वेल आपुली
बावरते, कधी सावरते
स्पर्शलाजर्या हिंदोळ्यावर
झुलते आणिक सुखावते.
जयश्री अंबासकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3110
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोड आहे एकदम .
:)
गोड आहे एकदम .:)
छानच
हाय जयश्रि
कविता छानच आहे. मीपा वरचा पहिला वहिला प्रतिसाद...छान वाटतय आपल्या भाषेत लिहायला.
आह! काय फोटो निवडलाय. अन
आह! काय फोटो निवडलाय. अन कविता कशी रुणझुणत येते. मस्ताड!
फारच गोड.
फारच गोड.
मस्त.
मस्त. :-)
खूपच छान
खूपच छान
खूपच छान
खूपच छान
जयश्री, बर्याच कालावधी नंतर तुझी सुरेख कविता वाचायला मिळाली
निकनेम माहिती नसल्यानं पोस्ट उघडणार नव्हतो पण इतके लगोलग प्रतिसाद म्हटल्यावर काय आहे ते बघू, तर.. वॉट अ लव्हली सप्राइज! धन्यवाद
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद :)
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
छान
खूप खूप छान
छान आहे
खूप आवडली. खूप छान फ्लो आहे.
सुंदर कविता..
कविता वाचताना "मायेच्या हळव्या" हे गाणं आठवलं.
सुंदर
सुंदर