अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा
देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे.
लुळ्या पांगळ्या झालेल्या देशावर
भिक मागायची वेळ आणली आहे.
आता नाही तर कधीच नाही अस म्हणत
देश वाचायची वेळ आली आहे.
फुटीरपणाच्या निराशेचा विषप्याला रिचवत रिचवत
मरणासन्न झालेल्या देशाला,
एकसंध आशेचा जीवनप्याला पाजुन
नवसंजीवनी द्यायची वेळ आली आहे.
लाचलुचपत, सत्तांद्यपणा, जातियवाद, गरीबी,
ह्यामुळे पोखरलेल्या देशाला,
प्रामाणिकपणा, बंधुभाव, ईश्वरवाद, उदारपणा,
ह्यांचा चव्यन प्राश द्यायची वेळ आली आहे.
देशबुडव्या, दांभिक देशद्रोह्यांना हाकलुन लावत
देशप्रेमाची हाक द्यायची वेळ आली आहे.
अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा
देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे.
अरे समस्त गुणी जनांनो......
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1397
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
निशा इकडे पहा
चौकटराजा साहेब, पुढील वेळी नक्की काळजी घेण्यात येईल
विचार स्वातंत्र्याचा विजय असो. माझी कविता ही उडवली जावी ही
नको नको