देवळाबाहेरचा गाभारा
एकदा वाटल की देवळात जावं
आणि देवाच दर्शन घ्यावं
भर दुपारी तशी शांतताच होती,
बहुतेक देवाचीसुद्धा आरामाची वेळ होती,
मनात म्हंटलं नको द्यायला त्याला त्रास
घटकाभर बघावी वाट, आणि पहावी आरास
गाभारा तसा दिसत होता बराच प्रशस्त
त्याची भग्नता देत होती गतवैभवाची साक्ष
प्रांगणही देवळाच तसं जाणवत होतं मोठं
पडक्या तटबंदीत सावरत होतं कस बसं
एका कोनाड्यात काही लोक दिसत होते,
दगडातून काहीतरी घडवत बसले होते,
त्यातली काही वयस्कर, प्रौढ तर काही तरणी होती,
जी छन्नी हातोड्याने नवनिर्मितेचे गीत गात होती,
आजूबाजूला काही लहान मुलं ही खेळत होती,
पण उडणार्या दगडांची त्यांना मुळीच चिंता नव्हती
एक वेगळीच जादू त्या लोकांच्या हाती होती,
जी काळ्या पाषाणातसुद्धा जीव ओतीत होती,
साधारण मानवाची ही कसली किमया न्यारी,
गाभार्यामतला देवही ती अचंभीत होऊन पाही,
हातून त्यांच्या काय घडत होतं,
ह्याच मात्र त्यांना भानही नव्हतं
प्रत्येक घावाबरोबर दगडांचे उडत होते तुकडे,
पण घडवणार्याचे चेहेरे मात्र मक्ख कोरडे,
एकाच कारणासाठी बहुतेक त्यांनी हातोडी धरली,
ज्याने कशीबशी त्यांच्या पोटाची खळगी भरली,
निरागस कर्माच्या घामाचे जेव्हा दगडावर अभिषेक केले,
तेव्हाच पाषाणाचे हृदय द्रवून दैव बाहेर पडले,
मी मात्र विचार करू लागलो,
आणि थोडासा गोंधळात पडलो,
गाभार्यातल्या दगडात देव असतो
की राबत्या हातात तो वसतो,
कोणत्या दर्शनाला आलेलो
आणि कोणते दर्शन झालेले,
आता उशीर खूप झालेला,
गाभाराही आता गजबजलेला
नकळत हलकेच पाय निघू लागले,
अन दर्शंनाविणाच माघारी फिरू लागले,
पारिजात...
जीव घाबरा झाला ना! थीम छान
खूप सुंदर कविता.
सरळपणे व्यक्त झालेल्याआ
आवडली कविता.
अप्रतिम....
व्वा
आशयपूर्ण कविता ... सुरेख!
झंम्प्या साहेब, अतिशय सुंदर कविता.
धन्यवाद
छान कविता !
आवडली कविता.
कविता आवडली
वास्तवदर्शि कविता आहे.
वास्तववादी कवितेशी सहमत आहे.
आवडली..
सुंदर
वास्तववादी ! छान ! !