हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
तिथंच गाठलं त्यानं
ग बाई
तिथंच गाठलं त्यानं ||धृ||
पायवाट नागमोडी
पांधीतून जायी गाडी
शेतावर सावरूनी
चालले बांधावरूनी
एकल्याच नारंला
तिथंच गाठलं त्यानं ||१||
मोठी झुंबड तिथं झाली
आधाराला नाही सावली
व्दाड वारा पदराशी
खेळला, पाडला पायाशी
सावरू तरी मी कशी
त्यानं ठरवलं झोंबणं ||२||
आधी जरा घाबरले बावरले
पण मी मला नाही सावरले
त्याला अंगाशी ओढले
त्याच्यामधीच भिजले
अस्सा तस्सा आला बरसून
गेला तन चिंब भिजवूनं ||३||
हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं ||धृ||
- पाषाणभेद
(पुर्वप्रकाशीत)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1487
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा शाहीर!
मस्त हो पाभे. बर्याच
झोंबाझोंबी आवडली.
आवडलं...
हो ना! धरती माय भिजु दे! पाभे
In reply to आवडलं... by प्रभाकर पेठकर
(No subject)
मस्त... काय हो दफोराव इतक