चंद्र फुलांचे हार गळा
रात्र सजविशी अंग-कळा || धृ. ||
धुंद धुंद मन, बहर-बंध तन
स्पर्श रेशमी, घुसमटतो घन
छेड काढता, लटक्या रागे
म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ ||
देह उमलले, मिठीत रमले
श्वास केतकी, गुंफून पडले
रात्री मधुनी, कळीकाळाच्या
रंगला हा रास खुळा || २ ||
एकतनूता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफिलीत ह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ ||
-पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1998
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह!
एकतनूता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफिलीत ह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा
लव्हली!!
देहाहुनही मुक्त भावना
शरणागत बापुडी...
सुरेख!
सुरेख!
मस्त
मस्त
छानच!
छानच!
सुरेख!
सुरेख!
व्वा! "कृष्ण-काळा" येथे
व्वा!
"कृष्ण-काळा" येथे श्लेष खुलून आला असता असं वाटून गेलं. कविता उत्तमच. :)
आहे की की नाही?
In reply to व्वा! "कृष्ण-काळा" येथे by मेघवेडा
आहे की :) की नाही?
उत्तम..
मस्त कविता..
उत्तम..
मस्त कविता..
छान
बहुदा पहिलीच कळण्यासारखी कविता. म्हणून विशेष कौतुक वाटले :)
आयला, पेशवे जिओ!
असं काही तरी लिहा ना राव!
सुरेख कविता..
सुरेख कविता..