Skip to main content

का ग धरिला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/07/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.

जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला
ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला

मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती
फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला

पाहिली होती सखे तू बेवफाई माझी
श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला

ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे
संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला

मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन
पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला

जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला
ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 806
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया