Skip to main content

दूर-आशा

मंगळवार, 29/05/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पापण्यांचे सोस माझ्या पंजरी बिलगून हे अंतरी ओल्या खळ्याचे श्वास अजुनी नागवे अंकुरे खडकातही; ध्यासातले आलेख हे खोल रुतलेले; कळे ना कोण संधी जागवे ओतणे निर्व्याज पाणी आणि अगणित जोगवे थेंब थेंबाचा उसासा शार माती जोजवे गुदमराला एक रेषेचे उताविळ घर नवे दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे .................................अज्ञात
लेखनविषय:

वाचने 1143
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

दूर-आशा गात येई कोंब घेउनिया सवे शेवटच्या ओळीपासून ते पहिल्या ओळी पर्यंत प्रत्येक शब्द न शब्द आवडला रघू