या आईला तर काही, काही कळत नाही..
------------------------------------------
या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा..जरा ब्रेक नाही..
झोपेतच उठवून नेते..खाण्यासाठी रागे भरते
इतक्या सक्काळी सक्काळी ..भूक लागत नाही
या आईला तर काही....काही कळत नाही .................................|१|
दूध पितांना कार्टून जरा, पाहू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते..बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते..रडू देत नाही
या आईला तर काही....काही कळत नाही..................................|२|
कपडे, भांग, पावडर, शूज..सारं करून देते
बस येईल म्हणून मला ..बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून..भरभर येते
फूल तोडून देते तिला..कौतुकच नाही
या आईला तर काही..काही कळत नाही....................................|३|
शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू...एव्हढेच म्हणते
अभ्यास काय दिलाय माझा.. हेच पाहत बसते
तिचं चित्रं काढलेलं...लक्ष देत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही....................................|४|
होमवर्क..खाणं, क्राफ्ट ..डायरी शोधते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं, कळतच नाही
या आईला तर काही..काही कळत नाही....................................|५|
दमून जेव्हां झोपते मी..आईला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला या, जरा वेळ नाही
पापा घेत राहते आणि ..अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला चालत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही....................................|६|
- संध्या
या आधी ऑर्कुट व अन्यत्र प्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3308
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा...वा...वा...! वेलकम
+१ असेच म्हणतो.
In reply to वा...वा...वा...! वेलकम by अत्रुप्त आत्मा
वा वा काय पुर्वतयारी आहे. हा
In reply to +१ असेच म्हणतो. by प्रचेतस
पनन्नास राव
In reply to वा वा काय पुर्वतयारी आहे. हा by ५० फक्त
@हा प्रतिसाद कवितेला नसुन
In reply to वा वा काय पुर्वतयारी आहे. हा by ५० फक्त
अरे वा! इतक्या दिवसानंतर आगमन
मस्त ..सदाबहार ..
व्वा मस्तं...
परकाया प्रवेशाची कला
चान चान...!
In reply to परकाया प्रवेशाची कला by चौकटराजा
मस्त !
मस्त
कविता खूपच मस्त!
आवडेश
आपल्या सर्वांचे मनापासून आभार