Skip to main content

या आईला तर काही, काही कळत नाही ..

गुरुवार, 19/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
या आईला तर काही, काही कळत नाही.. ------------------------------------------ या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा..जरा ब्रेक नाही.. झोपेतच उठवून नेते..खाण्यासाठी रागे भरते इतक्या सक्काळी सक्काळी ..भूक लागत नाही या आईला तर काही....काही कळत नाही .................................|१| दूध पितांना कार्टून जरा, पाहू देत नाही.. बाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही सारखी सारखी घड्याळ बघते..बसू देत नाही बाथरूममधे ओढत नेते..रडू देत नाही या आईला तर काही....काही कळत नाही..................................|२| कपडे, भांग, पावडर, शूज..सारं करून देते बस येईल म्हणून मला ..बाहेर खेचत नेते उशीर झाला किती म्हणून..भरभर येते फूल तोडून देते तिला..कौतुकच नाही या आईला तर काही..काही कळत नाही....................................|३| शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते संपवला का नाहीस शोनू...एव्हढेच म्हणते अभ्यास काय दिलाय माझा.. हेच पाहत बसते तिचं चित्रं काढलेलं...लक्ष देत नाही या आईला तर काही..काही कळत नाही....................................|४| होमवर्क..खाणं, क्राफ्ट ..डायरी शोधते मला मात्र बीनची गंमत आठवत असते लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते तिच्या कसं लक्षात येतं, कळतच नाही या आईला तर काही..काही कळत नाही....................................|५| दमून जेव्हां झोपते मी..आईला बिलगते तेव्हां म्हणते शोन्याला या, जरा वेळ नाही पापा घेत राहते आणि ..अश्रू पुसून घेते आई अशी रडलेली मला चालत नाही या आईला तर काही..काही कळत नाही....................................|६| - संध्या या आधी ऑर्कुट व अन्यत्र प्रकाशित
लेखनविषय:

वाचने 3308
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

वा...वा...वा...! वेलकम बॅक... खूप छान बालगीत आहे... वाचता वाचता-ए आई मला पावसात जाऊ दे,एकदा तरी भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे या गाण्याची अठवण कधी झाली ते कळलच नाही...मस्त मस्त मस्त... :-)

In reply to by प्रचेतस

वा वा काय पुर्वतयारी आहे. हा प्रतिसाद कवितेला नसुन प्रतिसादाला आहे, कवितेत केलेंल वर्णन आमच्याकडं डेली सोप आहे, त्याचं काय अन किती कौतुक करणार.

In reply to by ५० फक्त

हलकेच घेणार आपण अशी आशा बाळगून एक वाक्या चावट पणे खाली लिहितोय ! वल्ली हे खरंच वल्ली आहेत . प्लस वन , प्लस प्लस वन , सुंदर कविता, मस्त जमलेय, अशा अनेक न दुखविणार्‍या प्रतिक्रियांचा डेटाबेस त्यांचे कडे आहे. अनुभवाअंती मी ही तो कॉपी पेस्ट करावा या निर्णयाला आलो आहे,

In reply to by ५० फक्त

@हा प्रतिसाद कवितेला नसुन प्रतिसादाला आहे, >>> कुणाच्या...? ;-) @कवितेत केलेंल वर्णन आमच्याकडं डेली सोप आहे, त्याचं काय अन किती कौतुक करणार.>> अरेरे..विधात्या काय म्हणावे या रसिकतेला... डेल्ली सोप आणी अभ्यंगस्नानातला फरकही यांना कळेनासा झालाय...

अरे वा! इतक्या दिवसानंतर आगमन झाल. कविता छान आहे, आत्मा म्हणतात तसं, कविता वाचल्यावर "ये आई! मला पावसात जाऊ दे." या बालकवितेचीच आठवण आली. :)

व्वा ! फारच छान, हृदयाला भिडणारं काव्य. आपलं, मोठ्यांचं, जग आणि लहानग्यांचं जग किती किती वेगळं असतं. आपण त्यांच्या जगात यावं अशी त्यांची खुप खुप इच्छा असते पण आपण न कळत त्यांना आपल्या जगात ओढत राहतो.

लहान मूल होणं त्याच्या नजरेतून भवताल पहाणं अशी कला येरा गबाळ्याला साध्य होत नाही. परकाया प्रवेशाचे हे सामर्थ्य देवदयेचे लाभते. देवदयेने मला लाभली जगावेगळी श्रीमंती ....मी भाग्यवती असे म्हणायला आपण मोकळ्या आहात .कविता फारच सुन्दर ! पुनरागमनाबद्दल कोटी कोटी आभार ! चौराकाका ( आपणच दिलेली उपाधी )

आवडेश.

मस्त कविता! :)