मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

मुक्तसुनीत · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
दंभकुठार यांच्या मुळे एक इंग्रजी कविता वाचायला मिळाली : An Almost Made Up Poem: see you drinking at a fountain with tiny blue hands, no, your hands are not tiny they are small, and the fountain is in France where you wrote me that last letter and I answered and never heard from you again. you used to write insane poems about ANGELS AND GOD, all in upper case, and you knew famous artists and most of them were your lovers, and I wrote back, it’ all right, go ahead, enter their lives, I’ not jealous because we’ never met. we got close once in New Orleans, one half block, but never met, never touched. so you went with the famous and wrote about the famous, and, of course, what you found out is that the famous are worried about their fame –– not the beautiful young girl in bed with them, who gives them that, and then awakens in the morning to write upper case poems about ANGELS AND GOD. we know God is dead, they’ told us, but listening to you I wasn’ sure. maybe it was the upper case. you were one of the best female poets and I told the publishers, editors, “ her, print her, she’ mad but she’ magic. there’ no lie in her fire.” I loved you like a man loves a woman he never touches, only writes to, keeps little photographs of. I would have loved you more if I had sat in a small room rolling a cigarette and listened to you piss in the bathroom, but that didn’ happen. your letters got sadder. your lovers betrayed you. kid, I wrote back, all lovers betray. it didn’ help. you said you had a crying bench and it was by a bridge and the bridge was over a river and you sat on the crying bench every night and wept for the lovers who had hurt and forgotten you. I wrote back but never heard again. a friend wrote me of your suicide 3 or 4 months after it happened. if I had met you I would probably have been unfair to you or you to me. it was best like this. Charles Bukowski बुकोव्स्की यांची क्षमा मागून केलेले माझे भाषांतर : त्या कारंज्यापाशी पीत बसलेली तुला नेहमी पहाणारा मी निळसर, इवल्याशा हातांची तू, नाही तुझे हात इवले नाहीत, पण होते छोटेच; आणि तो कारंजाही फ्रान्समधला जिथून तू लिहीले मला तुझे शेवटचे पत्र आणि मी उत्तर लिहीले आणि त्यावर मला कधीच काही कळले नाही तुझ्याकडून. जाड , ढोबळ शब्दांत खुळ्या कविता लिहायचीस तू देव नि त्याच्या दूतांबद्दल; सगळ्या बड्या कलावंताना ओळखायचीस नि त्यातले जवळजवळ सगळे तुझे आशक. मी लिहीले, ठीक आहे बाई, जा त्यांच्या मागे. मी कशाला जळू - नाहीतरी भेटलोय कुठे कधी आपण. जास्तीत जास्त जवळ आलो होतो न्यू ऑर्लीन्समधे , अर्ध्या रस्त्यावर होतो एकमेकांच्या ; पण भेट नाही , स्पर्श नाही. त्यामुळे तू त्या बड्यांबरोबर गेलीस नि बड्यांबद्दल लिहीत राहिलीस , आणि अर्थातच , तुला कळले होते एव्हाना की मोठ्या लोकांना पर्वा असते आपल्या प्रसिद्धीबद्दलच, पण त्याना शय्येमधे "ते" देणार्‍या आणि सकाळी उठून जाड , ढोबळ शब्दांत देव नि त्याच्या दूतांबद्दल खुळ्या कविता लिहीणार्‍या सुंदर, तरुण मुलीबद्दल त्याना काहीही देणेघेणे नाही. देव मेलाय, आपल्या सगळ्याना तर ते ठाऊकच आहे. पण तुझ्या कविता वाचून वाटायचे - कुणास ठाऊक ? कदाचित त्या जाड ढोबळ शब्दांमुळे असेल, तू सर्वोत्तम कवयत्रींपैकी वाटायचीस म्हणून मी प्रकाशकांना सांगितले : "तिच्या , तिच्या कविता छापा. ती वेडी असेल पण तिच्यात जादू आहे. आणि तिच्यातल्या निखार्‍यांमधे कसलेच नाही हीण." एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे , तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी. कदाचित आपण एकाच खोलीत असताना मी सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते. पण ते व्हायचे नव्हते. तुझ्या पत्रांचा सूर आर्त होत गेला - तुझ्या सर्व आशकानी तुला फसवले होते. पोरी , मी लिहीले , सर्वच आशक फसवणूक करतात. त्याचा काही उपयोग नाही झाला . तू म्हणालीस तुझा एक रडण्याचा बाक होता, एका पूला शेजारी नि तो पूल होता नदीवर आणि तू त्या बाकावर रोज रात्री तुला दुखावणार्‍या नि विसरून गेलेल्या आशकांबद्दल शोक करत बसायचीस. मी उत्तर लिहीले पण नंतर तुझी उत्तरे थांबली. तुझ्या आत्महत्येनंतर तीन-चार महिन्यानी एका मित्राने त्याबद्दल मला कळवले. जर आपण भेटलो असतो तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम .

वाचने 7207 वाचनखूण प्रतिक्रिया 20

धमाल मुलगी Mon, 06/16/2008 - 09:40
कविता फरशी समजली नाही. पण हा भाग फारच किळसवाणा वाटला. सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते.

In reply to by धमाल मुलगी

मुक्तसुनीत Mon, 06/16/2008 - 09:43
या ओळींमधे दोन व्यक्तिंमधील "इंटीमसी"चे (मराठी शब्द ?) सूचन आहे असा माझा कयास आहे. काही वर्षांमागे "फूल्स रश इन" नावाचा प्रेमपट पाहिला होता. त्यात नायिका बाथरूममधे "ते" करत असताना नायकाला समोर बसून बोलण्याचा आग्रह करते असे एक दृष्य आहे.

मनिष Mon, 06/16/2008 - 10:01
इंटीमसी = जवळीक?? अशा धीट ओळी येतात बर्‍याच कवितेत... कवितेच्या शैलीने 'पाबलो नेरुदा' ची आठवण झाली. मुक्तसुनीत - रुपांतर अफलातून...फक्त वेगळ्या ठिकाणी ओळी तोडायला हव्या होत्या असे वाटले १-२ वेळा.

धन्यवाद. 'तिच्यातल्या निखार्‍यांमधे नाही कसलेच हीण... ' 'तिच्या पत्रांचा सूर आर्त होत गेला...' '..ठीक आहे बाई, जा त्यांच्या मागे, मी कशाला जळू?' 'खुळ्या कविता' अहाहा. मी मुद्दामहूनच हा अनुवाद न वाचता माझे गद्य भाषांतर खरडले. आणि मग हा अनुवाद वाचला. पुढचे काही सांगायला नकोच! :)) या सुरेख कवितेबद्दल आभार.

साती Mon, 06/16/2008 - 14:12
सुरेख कविता आणि सुरेख भाषांतर.(रूपांतर) शेवट तर छानच. साती

आनंदयात्री Mon, 06/16/2008 - 14:39
उत्तम भाषांतर मुक्तभाई ... अशीच निरनिराळ्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या रचनांची ओळख करुन द्या .. >>त्या जाड ढोबळ शब्दांमुळे फक्त हे थोडेसे खटकले .. ती अप्परकेस मधे कविता लिहायची यात तिची निरागसता दिसायची (जसे लहान मुले अप्परकेस जास्त वापरतात उदा. ईंग्रजी पहिलीतल्या मुलाचा निबंध) असेच ना ? जर तसेच असेल तर "जाड ढोबळ शब्दांमुळे" यातुन "अप्परकेस" वाली निरागसता रिफ्लेक्ट होत नाही असे जाणवले, अप्परकेस ला पर्यायी तुल्यबळ मराठी कन्सेप्ट ही नाही, हे ही खरे. सुंदर अनुवाद, कृपया असेच लेखन वरचेवर येउ द्यावे ही विनंती. धन्यवाद.

>>जर आपण भेटलो असतो तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. हे खासच. विफलतेची जाणीव अगदी मोजक्या नि भिडणार्‍या शब्दात आली आहे. छान अनुवाद

विसोबा खेचर Mon, 06/16/2008 - 17:29
वा मुक्तराव! तुम्ही अनुवाद छानच केला आहे! अभिनंदन... एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे , तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी. वरील ओळी खूप आवडल्या! आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Mon, 06/16/2008 - 22:39
इथे "फोटो खरडवहीत बाळगून " असे वाचावे का?? ह घ्या... :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विकास Tue, 06/17/2008 - 00:48
चांगले भाषांतर (इंटिमसी वाक्यांसंदर्भातः - कदाचीत शब्दार्थापेक्षा भावार्थाचे भाषांतर होऊ शकले तर अधिक योग्य दिसेल). तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम "गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा" असेच काहीसे कवीला सांगायचे आहे असे वाटले.

चतुरंग Tue, 06/17/2008 - 00:57
कवितेचा आत्मा आपण नक्कीच पकडला आहेत. जीवनाचे इतके प्रत्ययकारी वर्णन एखाद्या सुंदरशा लघुपटाची बीजकल्पना ठरु शकेल इतके सशक्त आहे. एक वेगळ्या ढंगाची कविता वाचायला दिल्याबद्दल अभिनंदन! (अजून असेच लिखाण येऊदेत). चतुरंग

मुक्तसुनीत Tue, 06/17/2008 - 03:23
तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहना/सूचनांबद्दल धन्यवाद. भाषांतर जमले तसे केले खरे; पण ते करण्यामागे उद्दिष्ट असेही होते की, या निमित्ताने इंग्रजी काव्यातल्या प्रवाहांबद्दल थोडीफार चर्चा व्हावी. दंभकुठार यांनी मूळ कविता टाकताना ती त्यांची आवडती कविता आहे ; कुणाला काव्याचे धडे गिरवायचे असतील तर बुकोव्स्की यांचा अभ्यास करावा असे म्हण्टले होते. या विधानांमुळे माझी उत्सुकता चाळवली गेली. त्यांनी दिलेली प्रस्तुत कविता मला स्वत:ला आवडलीच , पण इंग्रजीमधे "इट हॅज गॉट मोअर दॅन व्हॉट मीट्स द आय" म्हणतात तसे मला कुठेतरी वाटले. अर्थात, हे "मोअर" काय हे माहित असण्याची आणि समजाऊन सांगायची माझी कुवत नाही. तेव्हा, या निमित्ताने दंभकुठार यानी आपल्या अल्पाक्षरत्त्वाला थोडी मुरड घालावी आणि बुकोव्स्की आणि त्यांच्या जातकुळीच्या इतर इंग्रजी काव्याबद्दल थोडे विवेचन करावे.

In reply to by मुक्तसुनीत

मनिष Tue, 06/17/2008 - 10:56
तेव्हा, या निमित्ताने दंभकुठार यानी आपल्या अल्पाक्षरत्त्वाला थोडी मुरड घालावी आणि बुकोव्स्की आणि त्यांच्या जातकुळीच्या इतर इंग्रजी काव्याबद्दल थोडे विवेचन करावे.
हेच म्हणतो. @मुक्तसुनीत - मला वाटते तुम्हीही विवेचन छान करू शकाल! - मनिष अवांतर - मलाही 'पाब्लो नेरुदा' च्या एखाद्या कवितेच भाषांतर करायचा मोह होतोय...झेपेल की नाही कुणास ठाऊक?

Rainman Tue, 06/17/2008 - 14:23
अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी.......अस्पर्श - असा शब्द आहे का मराठीत ? जमलय पण भाषांतर , आणखी येवु द्यात अशा कविता...

In reply to by Rainman

भडकमकर मास्तर Tue, 06/17/2008 - 14:46
रूपांतरित कविता वाचली... मस्त जमली आहे... ( इंग्रजी पूर्ण वाचवली नव्हती)... अस्पर्श - असा शब्द आहे का मराठीत ? समजा नसला तरी अर्थ पोचतोय... मला तरी खटकला नाही... असो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/