✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

म — मुक्तसुनीत, Mon, 06/16/2008 - 09:36

प्रतिक्रिया द्या
7167 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ध
धमाल मुलगी Mon, 06/16/2008 - 09:40 नवीन

कविता फरशी

कविता फरशी समजली नाही. पण हा भाग फारच किळसवाणा वाटला. सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 06/16/2008 - 09:43 नवीन

माझा अंदाज

या ओळींमधे दोन व्यक्तिंमधील "इंटीमसी"चे (मराठी शब्द ?) सूचन आहे असा माझा कयास आहे. काही वर्षांमागे "फूल्स रश इन" नावाचा प्रेमपट पाहिला होता. त्यात नायिका बाथरूममधे "ते" करत असताना नायकाला समोर बसून बोलण्याचा आग्रह करते असे एक दृष्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगी
ध
धमाल मुलगी Mon, 06/16/2008 - 10:06 नवीन

इथे दिलेला

इथे दिलेला माझा प्रतिसाद नाहिसा का झाला आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मनिष Mon, 06/16/2008 - 10:01 नवीन

इंटीमसी =

इंटीमसी = जवळीक?? अशा धीट ओळी येतात बर्‍याच कवितेत... कवितेच्या शैलीने 'पाबलो नेरुदा' ची आठवण झाली. मुक्तसुनीत - रुपांतर अफलातून...फक्त वेगळ्या ठिकाणी ओळी तोडायला हव्या होत्या असे वाटले १-२ वेळा.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 06/16/2008 - 10:35 नवीन

:)

धन्यवाद. 'तिच्यातल्या निखार्‍यांमधे नाही कसलेच हीण... ' 'तिच्या पत्रांचा सूर आर्त होत गेला...' '..ठीक आहे बाई, जा त्यांच्या मागे, मी कशाला जळू?' 'खुळ्या कविता' अहाहा. मी मुद्दामहूनच हा अनुवाद न वाचता माझे गद्य भाषांतर खरडले. आणि मग हा अनुवाद वाचला. पुढचे काही सांगायला नकोच! :)) या सुरेख कवितेबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
स
साती Mon, 06/16/2008 - 14:12 नवीन

सुरेख!

सुरेख कविता आणि सुरेख भाषांतर.(रूपांतर) शेवट तर छानच. साती
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/16/2008 - 14:20 नवीन

सुरेख शेवट

मुक्तसुनित यांचे भाषांतर छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
ध
धनंजय Tue, 06/17/2008 - 02:41 नवीन

फस्क्लास

कठिण कवितेचे सुंदर भाषांतर जमले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
आ
आनंदयात्री Mon, 06/16/2008 - 14:39 नवीन

उत्तम

उत्तम भाषांतर मुक्तभाई ... अशीच निरनिराळ्या साहित्यिकांच्या वेगवेगळ्या रचनांची ओळख करुन द्या .. >>त्या जाड ढोबळ शब्दांमुळे फक्त हे थोडेसे खटकले .. ती अप्परकेस मधे कविता लिहायची यात तिची निरागसता दिसायची (जसे लहान मुले अप्परकेस जास्त वापरतात उदा. ईंग्रजी पहिलीतल्या मुलाचा निबंध) असेच ना ? जर तसेच असेल तर "जाड ढोबळ शब्दांमुळे" यातुन "अप्परकेस" वाली निरागसता रिफ्लेक्ट होत नाही असे जाणवले, अप्परकेस ला पर्यायी तुल्यबळ मराठी कन्सेप्ट ही नाही, हे ही खरे. सुंदर अनुवाद, कृपया असेच लेखन वरचेवर येउ द्यावे ही विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Mon, 06/16/2008 - 15:16 नवीन

>>जर आपण

>>जर आपण भेटलो असतो तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. हे खासच. विफलतेची जाणीव अगदी मोजक्या नि भिडणार्‍या शब्दात आली आहे. छान अनुवाद
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/16/2008 - 17:29 नवीन

वा!

वा मुक्तराव! तुम्ही अनुवाद छानच केला आहे! अभिनंदन... एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे , तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी. वरील ओळी खूप आवडल्या! आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 06/16/2008 - 22:39 नवीन

इथे "फोटो

इथे "फोटो खरडवहीत बाळगून " असे वाचावे का?? ह घ्या... :)) :)) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विकास Tue, 06/17/2008 - 00:48 नवीन

गोडी अपूर्णतेची...

चांगले भाषांतर (इंटिमसी वाक्यांसंदर्भातः - कदाचीत शब्दार्थापेक्षा भावार्थाचे भाषांतर होऊ शकले तर अधिक योग्य दिसेल). तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम "गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा" असेच काहीसे कवीला सांगायचे आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/17/2008 - 00:57 नवीन

मस्त, मुक्त, स्वैर भाषांतर

कवितेचा आत्मा आपण नक्कीच पकडला आहेत. जीवनाचे इतके प्रत्ययकारी वर्णन एखाद्या सुंदरशा लघुपटाची बीजकल्पना ठरु शकेल इतके सशक्त आहे. एक वेगळ्या ढंगाची कविता वाचायला दिल्याबद्दल अभिनंदन! (अजून असेच लिखाण येऊदेत). चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 06/17/2008 - 03:23 नवीन

भाषांतर

तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहना/सूचनांबद्दल धन्यवाद. भाषांतर जमले तसे केले खरे; पण ते करण्यामागे उद्दिष्ट असेही होते की, या निमित्ताने इंग्रजी काव्यातल्या प्रवाहांबद्दल थोडीफार चर्चा व्हावी. दंभकुठार यांनी मूळ कविता टाकताना ती त्यांची आवडती कविता आहे ; कुणाला काव्याचे धडे गिरवायचे असतील तर बुकोव्स्की यांचा अभ्यास करावा असे म्हण्टले होते. या विधानांमुळे माझी उत्सुकता चाळवली गेली. त्यांनी दिलेली प्रस्तुत कविता मला स्वत:ला आवडलीच , पण इंग्रजीमधे "इट हॅज गॉट मोअर दॅन व्हॉट मीट्स द आय" म्हणतात तसे मला कुठेतरी वाटले. अर्थात, हे "मोअर" काय हे माहित असण्याची आणि समजाऊन सांगायची माझी कुवत नाही. तेव्हा, या निमित्ताने दंभकुठार यानी आपल्या अल्पाक्षरत्त्वाला थोडी मुरड घालावी आणि बुकोव्स्की आणि त्यांच्या जातकुळीच्या इतर इंग्रजी काव्याबद्दल थोडे विवेचन करावे.
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 06/17/2008 - 10:56 नवीन

सहमत...

तेव्हा, या निमित्ताने दंभकुठार यानी आपल्या अल्पाक्षरत्त्वाला थोडी मुरड घालावी आणि बुकोव्स्की आणि त्यांच्या जातकुळीच्या इतर इंग्रजी काव्याबद्दल थोडे विवेचन करावे.
हेच म्हणतो. @मुक्तसुनीत - मला वाटते तुम्हीही विवेचन छान करू शकाल! - मनिष अवांतर - मलाही 'पाब्लो नेरुदा' च्या एखाद्या कवितेच भाषांतर करायचा मोह होतोय...झेपेल की नाही कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मेघना भुस्कुटे Tue, 06/17/2008 - 13:31 नवीन

ताबडतोब

ताबडतोब करा. वाट पाहतोय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
व
विसोबा खेचर Tue, 06/17/2008 - 14:48 नवीन

हेच,

ताबडतोब करा. वाट पाहतोय. हेच म्हणतो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
R
Rainman Tue, 06/17/2008 - 14:23 नवीन

अस्पर्श

अस्पर्श प्रेम करणार्‍या प्रियकराप्रमाणे होतो मी.......अस्पर्श - असा शब्द आहे का मराठीत ? जमलय पण भाषांतर , आणखी येवु द्यात अशा कविता...
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 06/17/2008 - 14:46 नवीन

रूपांतरित

रूपांतरित कविता वाचली... मस्त जमली आहे... ( इंग्रजी पूर्ण वाचवली नव्हती)... अस्पर्श - असा शब्द आहे का मराठीत ? समजा नसला तरी अर्थ पोचतोय... मला तरी खटकला नाही... असो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rainman

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा