Skip to main content

वळण

लेखक नपा यांनी गुरुवार, 29/03/2012 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वळणवर, वळताना नजर गेली इथवरच्या मार्गावरती दिसले माझेच पदचिन्हे स्पष्टपणे कधी योग्य, कधी अयोग्य कधी सन्तुलित तर कधी अनिर्बन्ध भयभीत वा निर्भिड थबकलो क्षणभर, स्वत:बद्दलचे समज गैरसमज धुसर झाले हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. वाट माझी खुणवत होती मन मात्र सुन्न होत् सावरलो, अन् पुन्हा लागलो अव्याहत प्रवासाला पूढच्या वळणावर थबकण्या करता..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2147
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत आणि पुढील लेखनाला शुभेच्छा!

धन्यावाद..!!

छान हे तर माझेच प्रतिबिंब.. आज़वरचे ..पण अगदि सत्य शहारलो, किती अनभिज्ञ होतो मी स्वत:ला.. हे आवडले.

बरेच काही सांगून जाते. कविता आवडली,पटली.