Skip to main content

एक भावनुवाद......

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 13/06/2008 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
एका सुप्रसिध्द हिन्दी गाण्याचा हा स्वैर भावानुवाद- एक प्रयत्न. गाण कुठलं लिहित नाही, ओळखाल ही अपेक्षा. जीवनाच्या सोबतीने टाकतो मी पावले चिन्ता नसे की काय येथे, कमविले वा गमविले..... बाजार येथे वेदनांचा मांडणे होते फुका दु:ख घेवोनी शिरी मग, सोहळे मी मांडले... जे मिळाले, तेच माझे , मानुनी स्वीकारले विसरुनी गेलो पुढे मी वाटेवरी जे हरवले... दु:ख आणिक सुख अता, मज वेगळे ना राहिले आल्या क्षणाला माझे म्हणुनी , मी उराशी घेतले....
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3732
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया