Skip to main content

त्याला ती हवीये...

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 19/03/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री कशीही असली तरी शेवटी पुरुषांना काय हवं असतं... बायकोच्या हातचा डबा.. ऑफिस मध्ये मिरवायला.. तिचा मउसुत हात.. केसातुन फिरवायला... तिची लांबसडक बोटं...मस्त तेल जिरवायला.. तिचे नाजुक ओठ.. गालावर फिरवायला.. आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला.. तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला.. तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला... तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.. त्याला बहीण हवी..हट्ट पुरवायला.. त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला... त्याला ती हवीये... माधुर्य टिकवायला... तिला तो हवाय.. गोडी वाढ्वायला... खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील.. पण त्या निमित्ताने स्त्री-पुरुषाच्या नात्यातले सुंदर कंगोरे पण टिपावे वाटले...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7743
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब आईची उबदार कुस.. सगळी दु:ख हरवायला.. तिचा मायेचा हात.. वरण भात भरवायला.. तिचा प्रेमळ धाक.. बाराखडी गिरवायला... तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला.. हे तुमच कडव अप्रतिम अप्रतिम अप्रतिम........ त्याला मुलगी हवी..जाताना रडवायला हि ओळ निव्वळ लाजवाब लाजवाब लाजवाब...

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर म्याडम, खरच माफि असावि. पण कविता एकदम मस्त

In reply to by निश

माफीची गरज नाय.................... 'साहेब'च्या मागे "बाई" लावा............. .................... हा. का. ना. का.

In reply to by सुधीर१३७

'साहेब'च्या मागे "बाई" लावा............. की बाई मागे साहेब लावून "बाईसाहेब" करा? :)

In reply to by निश

मस्त मस्त मस्त पिलीयन रायडर साहेब
या सायेब न्हवं सायबीन बै हात... बाकी :: मस्त जमलीये कविता...

खुप भांडण चालु आहेत.. चालु रहातील.. पण त्या निमित्ताने स्त्री-पुरुषाच्या नात्यातले सुंदर कंगोरे पण टिपावे वाटले...
कूल.

चला म्हन्जे पुरुष थोडे का होइना चंगले असतात. ;) त्याला ती हवी असते, या ना त्या कारणासाठि मतितार्थ : पुरुष स्वार्थी असतो

In reply to by किचेन

मतितार्थ : पुरुष स्वार्थी असतो
एकेकाचा द्रुष्टिकोन.. समज.. आवाका... अनुभव...

In reply to by कवितानागेश

स्वाक्शरी तून वयावा पत्ता लागत नाही पण आय डी वरून ंमंगोलियन असावी असे वाटते. कारण नावात ब्रूस ली, जेट ली आणि माउ त्से तुंग दिसतात .

ही कविता त्या धाग्यावरही आवडली होतीच. शेवटचं कडवं सगळ्यात छान :)

In reply to by माम्लेदारचा पन्खा

तुमच्या प्रश्नाचे उत्तर शेवटच्या वाक्यात अगदी थोडक्यात दिले आहे असे वाटते. कविता भावली.

पुरुषाच्या आयुष्यातल्या या सर्वात महत्वाच्या स्त्रिया. त्याची आई, बायको, बहीण आणि मुलगी.
तिच्या नावची शपथ.. जगालाही हरवायला..
...वाह...

दोघे एक्मेकांसार्खे नाहीतच (किंबहुना नसावेत अशी निसर्गानेच तरतूद केलीय ) पण एक्मेकांसाठी नक्कीच आहेत, दोघांचेही आयुष्य आणखी सुंदर्/सुखावह करण्यासाठी (ती ही तरतूद निसर्गानेच केलीय, भावबंधातून जोपासायची खुलवायची इतकेच करायचे दोघांनीही) पुलेशु ! स्त्रीमुक्ती आणि मुक्त स्त्री यातला नेमका फरक माहीत असलेला नाखु

'ती' आणि 'तो' दोघांनाही एकमेकांची मानसिक, भावनिक गरज असतेच असते. एकमेकांविना एकमेकांचे आयुष्य अधुरे असते. कविता सुंदर आहे. आवडली.

पि.रा. खूप छान कविता. थोड्क्या शब्दात किती मोठा आशय. अजून अशाच छान कविता लिही अन ईथे चिटकव.

कविता खूप आवडली. खरच पुरुषाला स्त्री ची आणि स्त्रीला पुरुषाची गरज असतेच.... अनादी पासून अनंतापर्यंत!