Skip to main content

जगणे असेच का असते?

लेखक निश
Published on गुरुवार, 15/03/2012
जगणे असेच का असते? जगता जगता मरायचे असते. जगण्याकरिता लढणे असेच का असते? लढता लढता हरायचे असते. जगण्यातले सुख असेच का असते? सुखाचि वाट बघता बघता दु:ख भोगायचे असते. जगण्यातली आशा अशीच का असते? आशेवर जगताना निराश व्हायचे असते. जगणे हे स्वप्नासारखे का असते ? सत्यात येता येता मोडुन ते पडते. खरच जगण हे एक कोड असते. ऊत्तर सापडल अस वाटत असताना नव कोड देउन ते शोधण्यात संपायचे असते.
लेखनविषय:

वाचन संख्या 2359
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

पूजाताई, धन्यवाद... ( नाही नाही.. मी "निश" नाही.. धन्यवाद हे निम्ननिर्दिष्ट कारणांसाठी: १. स्वाक्षरीला शेपरेटर टाकल्याबद्दल.. हुश्श.. २. जीभ काढण्याच्या स्माईलीशिवाय प्रतिसाद लिहीण्याच्या नवीन पद्धतीबद्दल.. )

In reply to by जेनी...

बाकि अत्रुप्त आत्म्याची क्रुपा >>> सगळ्या स्मायल्यांसह वाक्याला धन्यवाद ;-) (स्मायल्या अवडणारा) अ-त्रुप्त आत्मा ;-)

वाहताना सुद्धा कुठे कसलाच, अडथळा मिळत नाही, अहो हे असे नसते :bigsmile: :bigsmile: बद्ध कोष्ठी दगड गोटे वाहात जाती पाण्या वाटे... ;)

निश, या सगळ्या चढ उतारात तर जीवनाची मजा आहे. नसते दु:ख या जगी, सुखाला कोणी असते विचारले ? नसते मूर्ख या जगी, शहाण्याला कोणी असते विचारले? नसते दु:शासन या जगी, कृष्णा कोणी असते पुकारले ? नसते कुरूप या जगी, सुंदरीस कोणी असते निरखिले ? कविता मस्त जमली आहे.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा साहेब, प्रोत्साहना करिता धन्यवाद. पण खर सांगु साहेब तुम्हि वर केलेली कविता निव्वळ लाजवाब.