Skip to main content

जोवरी

Published on गुरुवार, 15/03/2012
सागराच्या तळाशी किती रत्नराशी जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी मानवाची स्थिती वादळे संगती मरणबाजार अवघा लढे पावसाशी जात जातीत भेदे कुणी क्षूद्र वंशी कळे ना कसे तो तयाचाच अंशी बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी यातना ही खरी अंत तो तूच आहे पसारा दिगंत खंत पामरास दाहे जगावे उरावे जिणे तोषवावे जपावे झरे जोवरी श्वास वाहे ............................अज्ञात
लेखनविषय:

वाचन संख्या 1440
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

परत एकदा अद्भुत रचना!!
यातना ही खरी अंत तो तूच आहे पसारा दिगंत खंत पामरास दाहे जगावे उरावे जिणे तोषवावे जपावे झरे जोवरी श्वास वाहे
__/\__

यातना ही खरी अंत तो तूच आहे पसारा दिगंत खंत पामरास दाहे जगावे उरावे जिणे तोषवावे जपावे झरे जोवरी श्वास वाहे
शब्दसौंदर्य आवडलं.

पण पहिल्या कडव्याच्या पहिल्या तीन ओळींचा एक मेंकाशी संबंध लावू शकलो नाही. "नकाशाशी झुंझणारा शशी " नाही समजला. पण दुसरे तिसरे कडवे फार म्हणजे फारच ऊत्तम.

In reply to by तर्री

फॅसिस्ट लोकांना ल्युनॅटिक म्हणतात. त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव असतो असे मानतात. जगाचा नकाशा अशा लोकांमुळे आज धोक्यात आहे.

मला काय बी कळ्ळं नाय . म्या पामर गदिमा च्या प्रसादगुण संस्कारात वाढलेला. ह्ये विश्वरूप दर्शन मला न दिसले . रसिक म्हणे मी स्वतः ला हे डोके माझे कसले ?

In reply to by चौकटराजा

मला काय बी कळ्ळं नाय . असु द्या हो काका..? सॉरी आजोबा ,आता साठी आली... ;) या वयात समजुन घेण जरा कठीण्च जात.. ;) म्हण्तात ना 'साठी बुद्धि नाठी' .. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

मला काय बी कळ्ळं नाय . म्या पामर गदिमा च्या प्रसादगुण संस्कारात वाढलेला. ह्ये विश्वरूप दर्शन मला न दिसले . रसिक म्हणे मी स्वतः ला हे डोके माझे कसले ?