सागराच्या तळाशी किती रत्नराशी
जगाच्या नकाशाशी झुंझतो शशी
मानवाची स्थिती वादळे संगती
मरणबाजार अवघा लढे पावसाशी
जात जातीत भेदे कुणी क्षूद्र वंशी
कळे ना कसे तो तयाचाच अंशी
बिचारे विचारांचे क्षेत्र कोरडे
स्नेह जाळून आळवे ती प्रार्थना कशी
यातना ही खरी अंत तो तूच आहे
पसारा दिगंत खंत पामरास दाहे
जगावे उरावे जिणे तोषवावे
जपावे झरे जोवरी श्वास वाहे
............................अज्ञात
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1440
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__
यातना ही खरी अंत तो तूच
@शब्दसौंदर्य आवडलं. +१
In reply to यातना ही खरी अंत तो तूच by प्रचेतस
मला दुसरे कडवे खूप आवडले.
"नकाशाशी झुंझणारा शशी "
In reply to मला दुसरे कडवे खूप आवडले. by तर्री
अज्ञातकुल साहेब, मस्त कविता
माझ्या पार डोक्यावरून
मला काय बी कळ्ळं नाय . असु
In reply to माझ्या पार डोक्यावरून by चौकटराजा
माझ्या पार डोक्यावरून
?
In reply to माझ्या पार डोक्यावरून by चौकटराजा