रस्ता
जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता
असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता
कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी
दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी
ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता
असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता
टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना
बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना
उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या
सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या
शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता
असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता
उरल्या सुरल्या.. जागेमधूनी, लागती शर्यती
पळा पळा हो, कोण पुढे ते, स्वार कसे धावती
पल्याड जाण्या, सज्ज होते, पिकलेले एक पान
खबरदार, जर जाल पुढे तर, चिरडतील हो छान
मातीचा होता, . तेव्हा हा सम़ंजस होता
असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता
तिथेच भरते रस्त्याकडेला, चिमण्यांची शाळा
भेदरलेल्या नजरा, आणिक वाहनांच्या माळा
भयाण वेगे चाकरमानी, उडवितात गाड्या
वेगापुढती विवेक बुडे जो , आवरा हो नाड्या
वाहनांपेक्षा जीवन जेव्हां स्वस्त होत जाता
असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता
संध्या
01 Feb 2010
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत आहे....
कविता फारच छान झाली आहे.. पुढील लेखनास शुभेच्छा :)
ही कविता पाहून मला तुमच्याच
In reply to मिपावर स्वागत आहे.... by लीलाधर
ही कविता पाहून मला तुमच्याच फळा ह्या कवितेची आठवण झाली.
यमकाला यमक जुळले जिथे, कवितेची नवी जिलबी पडली तिथे.
चतुर चाणक्य, आभार
चतुर चाणक्य, आभार आपले.
वल्ली, गैरसमजास औषध नोहे. फळा ही कविता माझी नाही . मायबोली आणि ऑर्कुटवर याच नावाने आहे पहा ही कविता.
अहो ताई, मी कुठे म्हणालोय फळा
In reply to चतुर चाणक्य, आभार by सांजसंध्या
अहो ताई, मी कुठे म्हणालोय फळा ही कविता तुमची आहे?
मी चतुरचाणक्यांना तो प्रतिसाद दिलाय. तुम्हास नोहे.
हो हो.. ते आलेलं लक्षात. (
हो हो.. ते आलेलं लक्षात. ( स्मायली कल्पावी )
पर्वापासुन खातो आहे गरमगरम
पर्वापासुन खातो आहे गरमगरम पास्ता
वल्ली...या...आजची नविन डिश करु दोघे नाश्ता
कडक भाजणी-खमंग मसाला,वरती हे लोणी
दोन ग्लासात भरु पिण्याला गोव्याची फेणी
पर्वाच्या त्या पावाहुनी हा मऊ म्हणे होता
वल्ली...या...आजची नविन डिश करु दोघे नाश्ता
मिपावरती उभी रहाते काव्यांची सेना
कुठ्ठेही जा तर हेच भेटती,अमुची ही दैना
उरली-सुरली जागा व्यापुन फुटपाथवर आल्या
जुन्या कविंनी पाहुन यांना केला सूं...बाल्या
अहो ''धनाजी'' सामान* घेऊन या जरा आता
असह्य झाले तरी खातो,आहे हा पास्ता
उरल्या सुरल्या पिठामधुनी पाडु किती जिल्बी?
स्टंम्प वाचण्या पाय घालता झालो पुरता एल्बी..!
जिल्बी खाण्या सुसज्ज होते, जरी तुटो मान
खबरदार जर खाल पुढे तर,डबडे देऊ छान... :-p
कुंथुन कुंथुन कितिही केले, त्वरे नाही होता
आंम्ही दिली परगोलॅक्स,वल्ली द्या जमालगोटा ;-)
तिथेच पल्याड रस्त्याकडेला जिल्ब्यांचा गाळा
भरलेला तो तांब्या आणिक,टाकायचा चाळा
भायाण वेगे काव्यमुनीही टाकतात जिल्ब्या
उन्हाळ्यातल्या उष्म्यावरती थंडगार कुल्फ्या
कवितांपेक्षा कवी-जेंव्हा स्वस्त होत जाता
असह्य जाहले तरी खातो आहे हा पास्ता..
ता.क. सामान*- धनाजींची ''माझं हे सामान सखू'' ही कविता... (धनाजीस णम्र इनंती काव्य विभागात लवकर लिहिते व्हा ;-) )
_/\__/\__/\_ भटजी, तुमच्या
In reply to पर्वापासुन खातो आहे गरमगरम by अत्रुप्त आत्मा
_/\__/\__/\_
भटजी, तुमच्या अफाट काव्यप्रतिभेला आमचा मानाचा मुजरा.
येणारच होतो मी खाण्यास पास्ता
त्याआधीच तुम्ही मात्र अडवला रस्ता
येणारच होतो मी खाण्यास पास्ता
पण संपवला तुम्ही, आता बसलोय नुस्ता.
येणारच होतो मी खाण्यास पास्ता
आता तरी शिल्लक ठेवायचा द्या मला वास्ता. :P
@भटजी, तुमच्या अफाट
In reply to _/\__/\__/\_ भटजी, तुमच्या by प्रचेतस
@भटजी, तुमच्या अफाट काव्यप्रतिभेला आमचा मानाचा मुजरा.>>>
फाटलो.. ;-)
दंडवत हो भटजीबूवा. !!! त्या
In reply to @भटजी, तुमच्या अफाट by अत्रुप्त आत्मा
दंडवत हो भटजीबूवा. !!!
त्या स्मायली कुठून आणता आणि त्या इथे कशा टाकता ते जरा आम्हालाही शिकवा राव. ;)
--^-- आमचाही दंडवत घ्या
In reply to दंडवत हो भटजीबूवा. !!! त्या by धन्या
--^--
आमचाही दंडवत घ्या भटजीबुवा. खतरनाक रचना!
अरे या अत्रुप्त आत्माला आवरा
In reply to पर्वापासुन खातो आहे गरमगरम by अत्रुप्त आत्मा
अरे या अत्रुप्त आत्माला आवरा रे कुणीतरी,हल्ली गाडी एकदम सुसाट सूटलीये याची ;)


+१
In reply to अरे या अत्रुप्त आत्माला आवरा by पियुशा
सहमत...
जबराट!!
In reply to पर्वापासुन खातो आहे गरमगरम by अत्रुप्त आत्मा
जबराट!! :)
अत्रुप्त आत्मा आपल्यासारख्या
अत्रुप्त आत्मा
आपल्यासारख्या सिद्धहस्त कवीला या कवितेचे विडंबन करावेसे वाटले हा सन्मानच समजेन मी.. आभार :)
@आपल्यासारख्या सिद्धहस्त
In reply to अत्रुप्त आत्मा आपल्यासारख्या by सांजसंध्या
@आपल्यासारख्या सिद्धहस्त कवीला या कवितेचे विडंबन करावेसे वाटले हा सन्मानच समजेन मी.. आभार>>> आपल्या दिलखुलास प्रतिसादास आमचा विनम्र सलाम :-)
कविता आणि विडंबन दोन्हीची
कविता आणि विडंबन दोन्हीची जुगलबंदी आवड्ली आहे.:)
पुढील कवितेच्या प्रतिक्षेत!!
पुढील कवितेच्या प्रतिक्षेत!! ;)
आपल्या सर्वांचे आभार
आपल्या सर्वांचे आभार :)
लय भारी
एकदम छान.
क्या बात है !
सांजसंध्या, परफेक्ट टेन.
माणूस झाला सस्ता तरी पाळतो शिरस्ता
यातून बोध घेउन आपला वाहतो हा रस्ता