मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देखणी

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
नवी पालवी अन नवे अंतराणे जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे उराशी किती भोवले पाहुणे हे गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे पुन्हा पाखरे आळवीती तराणे जरेल्या तरूंचे उभरले कणे साद घाली कुणी देइ आमंत्रणे बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे मनाची कुपी उलगडी आवरणे गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे देखणी सुप्तशी उंबराची फुले अमृताच्या सरी द्वैत पारायणे .......................अज्ञात

वाचने 1386 वाचनखूण प्रतिक्रिया 5

मनीषा 01/03/2012 - 18:19
पुन्हा पाखरे आळवीती तराणे जरेल्या तरूंचे उभरले कणे साद घाली कुणी देइ आमंत्रणे बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे सुंदर कविता.

मिसळलेला काव्यप्रेमी 02/03/2012 - 11:09
मनाची कुपी उलगडी आवरणे गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे देखणी सुप्तशी उंबराची फुले अमृताच्या सरी द्वैत पारायणे
क्या बात! सुंदर!