नवी पालवी अन नवे अंतराणे
जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे
उराशी किती भोवले पाहुणे हे
गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे
पुन्हा पाखरे आळवीती तराणे
जरेल्या तरूंचे उभरले कणे
साद घाली कुणी देइ आमंत्रणे
बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे
मनाची कुपी उलगडी आवरणे
गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे
देखणी सुप्तशी उंबराची फुले
अमृताच्या सरी द्वैत पारायणे
.......................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1433
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुन्हा पाखरे आळवीती
पुन्हा पाखरे आळवीती तराणे
जरेल्या तरूंचे उभरले कणे
साद घाली कुणी देइ आमंत्रणे
बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे
सुंदर कविता.
आभार :)
In reply to पुन्हा पाखरे आळवीती by मनीषा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सुंदर कविता आहे
सुंदर कविता आहे
व्वाह!
क्या बात! सुंदर!
छान कविता. आशादायी ....
छान कविता. आशादायी .... आवडली.