Skip to main content

प्रेरीत

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 18/02/2012 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशीचे मन कोरे निरभ्र होते चांदणे सुखावत होते रज कैफाने झाडाआडुन मी होतो वेधत खेळ ऐहिकाचा पाऊल टाकले क्षितिजावर चंद्राने ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती आभास नव्हे; हा श्वास खास जगण्याचा ही साद अशी की अंतर्नाद सणाचा अचरासह चर ऐशा किमयेचा शेला मी साक्ष एक; प्रेरीत नित्य; ह्या नव्या युगाचा ........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1155
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नेहमी प्रमाणेच आशयगर्भ... :-) पण- कापड उच्च प्रतिचं असुन, विण मात्र जरा ढासळली...असे झाले आहे

ती भोर सावळ्या चतुर्दशीची होती डौलात ठाकली कोर; पोर सगुणा जणु होती पाहून ऐट चुकले ठोके हृदयाचे एव्हाना ती आरूढ काळजावरती झाली होती
..............!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

अप्रतिम!!!