Skip to main content

प्रेमरस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 18/01/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे पायी, गळे अभिमान इथेच निधान, कैवल्याच शब्दही निमाले, अश्रु ओघळले कैसे हे उमाळे, अंतर्यामी कारुण्य वात्सल्य, सखे तुझे प्रति प्रिती की आसक्ती, ठाव नाही एक मज ठाव, अंतरी जो भाव त्याचे नाव गाव, पुसू नको हृदयाची भाषा, न जाणे मस्तक मौन मात्र एक, प्रकटन असा हा ईश्वरीय , अनुभव सारा प्रेममरस धारा, चिंब चिंब
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2172
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

अत्यंत सुंदर रचना!!

एक मज ठाव, अंतरी जो भाव त्याचे नाव गाव, पुसू नको या ओळी तर फारच आवडल्या.

खुपच अप्रतिम ('टचिंग') ... ह्या ओळि तर ... लाजवाब! एक मज ठाव, अंतरी जो भाव त्याचे नाव गाव, पुसू नको हृदयाची भाषा, न जाणे मस्तक मौन मात्र एक, प्रकटन

कविता आवडली!

वा! सुंदर कविता!

अतिशय प्रासादिक झाली आहे. :) किंचित छिद्रान्वेष - ६-६-६-४ असा ओवीचा आकृतीबंध परखडपणे सांभाळता आला तर जास्त मजा येईल. उदा. तुझे पायी (४), गळे अभिमान (६) इथेच निधान (६), कैवल्याच (४) -------- ऐवजी तुझे पायी सारा (६), गळे अभिमान (६) इथेच निधान (६), कैवल्याचे (४)

In reply to by मेघवेडा

रंगाशेठचा छिद्रान्वेष पटला अनाठायी न वाटता.