नमस्कार,
मी इथे नवीन आहे. हि माझी पहिलीच कविता आहे.
तुम्हाला आवडेल अशी आशा करतो...
मन मौज कराया उडते....
भिरभिरणारा वारा होते...
खळखळणारा ओढा होते..
दाटल्या मेघामधुनी...
झरझरणार्या धारा होते...
मन मौज कराया उडते..
किलकिलणारी पहाट होते..
सळसळणारे पाते होते...
घनदाट वनराई मधले..
किलबिलणारे पक्षी होते...
मन मौज कराया उडते..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1357
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
छान आहे कविता.
छान आहे कविता.
कविता वाचुन खुप छान वाटले !!
वा.. आणखी लिहा!
वा.. आणखी लिहा! :)
मस्त असेच लिहित रहा.. वाचत
मस्त
असेच लिहित रहा.. वाचत आहे...
छान जमलय..पण अजुन थोडं पुढे
छान जमलय..पण अजुन थोडं पुढे लिहिलं जायला हवं होतं...
म्हणजे नाश्टा मिळाला,,,चवदार मिळाला,,,पण अर्धीच प्लेट,,असं वाटलं :-)
धन्यवाद...
आपल्या सर्व प्रतिक्रीया बद्दल धन्यवाद...
छान छान खुप आवड्ले...पण जरा
छान छान खुप आवड्ले...पण जरा जास्त असते तर पोट भरले आसते.हे म्हण्जे नुसते मन खवळ्ले..(हे तोंड खवळ्ले च्या चालीत घ्या..)