गालावर येणारी अवखळ लट
मानेला हिसका देऊन बाजुला सारण्याची
तुझी जीवघेणी लकब...
त्याचवेळी तुझ्या डोळ्याचे कोपरे हळूच बघून घेतात
समोरचा तडफडणारा जीव
अजून जिवंत आहे किंवा कसे?
काळ्याभोर लटेचा तो हिसका बसताच
खोलवर दडलेले कुठलेसे बीज
तरारून थरथरते आणि वरवर यायला बघते
ते धुमारे काळ्या डोहात कसलासा आकार घेत आहेत असे वाटू लागते
तोच टिक टॉक सॅंडल्स उडवित
तू निघून देखील जातेस
समोरचा पाचोळा बेफिकीरीने उधळीत
उडालेली धूळ काळ्या डोहात
धुमार्यान्ना गुदमरून टाकीत
पाण्यात विलीन होते
अस्वस्थ तरंग देखील नि:शब्द होतात
शब्दावाचून कुठली कविता?
तू येते आणिक जाते......
येताना अबोल धुमारे आणतेस
जाताना त्यां धुमार्याची होउ घातलेली
शब्दफुले कुसकरून निघून जातेस
तुला रोखण्याचे धैर्य नसतेच
मग मी कवितेलाच दोष देतो.....
ती येण्याआधीच गेलेली असते...........
********************
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1398
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छ्या...
छान कविता!
अरेच्चा! खरच की! शेवटची ओळ
In reply to छान कविता! by पैसा
छान आहे कविता
छान आहे. ती तुमच्याकडून निघून