Skip to main content

पोरका

पोरका

Published on शुक्रवार, 21/10/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
तेजाचा तो पुत्र पोरका उन्मुक्तीच्या रचतो गाथा त्या असूयेने असह्य होता विव्हळते मग जग आता -- युयुत्सु
लेखनविषय:

याद्या 1677
प्रतिक्रिया 8

In reply to by पाषाणभेद

माझ्या एका मित्राने मला त्याची ही कविता पाठवली. ती वाचल्यावर वरील चारोळी स्फुरली. अनौरस अतृप्तीच्या पेल्यामधुनी पितो अधाशी अमृत घोट हपापलेली जीभ चाटते जरी ओशाळे हसून ओंठ निर्वाणाच्या वाटेवरचे रंग उदास नि गूढ केशरी सत्य शोधता जीर्ण वासना ओशट भोळे प्रश्न विचारी पापभिरू अन पवित्र थोड्या मनास दिसले उदात्त काही झुगारण्या ती कवच-कुंडले मध्यमवर्गी; "जमतच नाही!" उठ जरासा पेटून आणिक उभा रहा सरसावून बाह्या सुखलंपट ह्या तना-मनातून दिव्यत्वाच्या फुटू दे लाह्या तेजाचा तू पुत्र पोरका, फुलव झळाळी जरी अनौरस. झेल बाण सत्याचे उमजून टीचभर छाती ताणुनी चौरस. --अजित भागवत

खरच फार गूढ आहे... सर्वप्रथम ही तेजा कोण ? तीचा तो पुत्र पोरका का आहे ? तो सूध्दा कवी आहे काय ? मग उन्मुक्तीच्या कशाला रचतोय गाथा ? बर तो कवी आहे हे मान्य केलं तर जेन देखे कोणी ते देखे कवी हे ब्रम्हवाक्य असताना त्याबद्दल असूयेने असह्य होता कामा नये हे समजूनही विव्हळते मग जग आता म्हणने म्हणजे कवीता फार खोलात आहे इतकचं कळतयं... सगळच अतर्क्य... दूसर्‍या मीतीशी नातं जोडणारं.... अकल्पीत.. अनाकलनीय.. भिषण व अत्यंत गूढ...

चारोळी आणि कविता छान आहे .. मस्त कविता जास्त कळाते आहे .. छानच आहे. चारोळीचा लगेच संधर्भ लागला नव्हता

कविता सुंदर आहे.अतिशय आवडली. पण.. असल्या काव्यइच्छांचा शेवट बहुदा,,,, ‘मुक्ती’च्या ह्या जयघोषापायी, कंठशोष होऊनी बसते वाचा l स्वप्ने आंधळी, पाहता,पाहता डोळ्यांच्याही होती खाचा l असाच हॊत असावा.