माझ्या एका मित्राने मला त्याची ही कविता पाठवली. ती वाचल्यावर वरील चारोळी स्फुरली.
अनौरस
अतृप्तीच्या पेल्यामधुनी
पितो अधाशी अमृत घोट
हपापलेली जीभ चाटते
जरी ओशाळे हसून ओंठ
निर्वाणाच्या वाटेवरचे
रंग उदास नि गूढ केशरी
सत्य शोधता जीर्ण वासना
ओशट भोळे प्रश्न विचारी
पापभिरू अन पवित्र थोड्या
मनास दिसले उदात्त काही
झुगारण्या ती कवच-कुंडले
मध्यमवर्गी; "जमतच नाही!"
उठ जरासा पेटून आणिक
उभा रहा सरसावून बाह्या
सुखलंपट ह्या तना-मनातून
दिव्यत्वाच्या फुटू दे लाह्या
तेजाचा तू पुत्र पोरका,
फुलव झळाळी जरी अनौरस.
झेल बाण सत्याचे उमजून
टीचभर छाती ताणुनी चौरस.
--अजित भागवत
खरच फार गूढ आहे... सर्वप्रथम ही तेजा कोण ? तीचा तो पुत्र पोरका का आहे ? तो सूध्दा कवी आहे काय ? मग उन्मुक्तीच्या कशाला रचतोय गाथा ? बर तो कवी आहे हे मान्य केलं तर जेन देखे कोणी ते देखे कवी हे ब्रम्हवाक्य असताना त्याबद्दल असूयेने असह्य होता कामा नये हे समजूनही विव्हळते मग जग आता म्हणने म्हणजे कवीता फार खोलात आहे इतकचं कळतयं... सगळच अतर्क्य... दूसर्या मीतीशी नातं जोडणारं.... अकल्पीत.. अनाकलनीय.. भिषण व अत्यंत गूढ...
कविता सुंदर आहे.अतिशय आवडली.
पण..
असल्या काव्यइच्छांचा शेवट बहुदा,,,,
‘मुक्ती’च्या ह्या जयघोषापायी,
कंठशोष होऊनी बसते वाचा l
स्वप्ने आंधळी, पाहता,पाहता
डोळ्यांच्याही होती खाचा l
असाच हॊत असावा.
प्रतिक्रिया
चारोळी छानच आहे. थोडीशी गुढ
माझ्या एका मित्राने मला
In reply to चारोळी छानच आहे. थोडीशी गुढ by पाषाणभेद
चरोळी -
थोडेसे रसग्रहण केले तर अजून आवडेल
ये तेजा तेजा क्या है ये तेजा तेजा ?
चारोळी आणि कविता छान आहे ..
कविता वाचनीय.
कविता सुंदर आहे.अतिशय