मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
युगलगीत: रंग हिरवा ओला ओला
तो: रंग हिरवा ओला ओला आला निसर्गाला ती: प्रित तुझी माझी यावी अशीच बहराला ||धृ|| तो: थेंब नभातून खाली झरती तो: पडता त्यांना ओठांवरती ती: चुंबून घ्यावे थोडे प्यावे ती: एक होवूनी वेडे व्हावे ||१|| तो: कधी प्रकाशात दिसते तो: इंद्रधनू ते सात रंगांचे ती: हवेत तसले रंग धनूचे ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२|| तो: मोहरलेला श्वास श्वासात तो: हात गुंतले तुझ्या हातात ती: निसर्गात या वेडे झाले ती: दोन जीवांचे नाते जडले ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०९/२०११

वाचने 1413 वाचनखूण प्रतिक्रिया 3

शाहिर 12/09/2011 - 15:34
छान !! पा भे म्हणजे दगडाला भेदुन पाझर फोडणारे

अत्रुप्त आत्मा 12/09/2011 - 17:01
वा पाषाणभेद वा....अतिशय सुंदर आणी निर्मळ प्रीतीने नटलेले मंगलमय काव्य...लाजवाब कधी प्रकाशात दिसते तो: इंद्रधनू ते सात रंगांचे ती: हवेत तसले रंग धनूचे ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२||.... या ओळी अतीशय मोहवून गेल्या...