Skip to main content

गोड गुन्हा

गोड गुन्हा

Published on 05/09/2011 - 01:55 प्रकाशित मुखपृष्ठ

सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा

माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी काय करतेस ग तू खाणाखूणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ|| समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१|| काल क्लासला का ग नाही आलीस? लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते; नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२|| कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून बरे दिसत नाही चारचौघात असलं वागणं नको बोलू गर्दीत, जावू एका बागेत थोडी तरी कळ काढ, बोलतो मी पुन्हा पुन्हा ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०५/०९/२०११

याद्या 1759
प्रतिक्रिया 7

In reply to by चित्रगुप्त

लय भारी चित्रपुप्त साहेब,लय भारी.... :-) अप्सरा आली,बाल्कनी मधुनी खाली ;-) ओठांना लाली, मोहक त्या हलचाली ही...झुकली वाकली,नजर टाकली कोणं दिसे भवताली?...अप्सरा आली...

पाषाण भेद - माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी काय करतेस ग तू खाणाखूणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ|| छान गुन्हा !!

In reply to by प्रकाश१११

माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी काय करतेस ग तू खाणाखूणा सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा

इस बार कुछ जम्या नही रे दगडाफोड्या.