अंतीम क्षण (गझल)
हि माझी पहिलीवहिली गझल!! परिपूर्ण नाहीये पण गझल म्हणता येईल इतपत गणित जमले आहे.
{ वृत्त – आनंदकंद || गण - गागालगा लगागा गागालगा लगागा}
अंतीम क्षण
सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
वारे तसेच होते जाळून जे जळाले
केसांतल्या फुलांची गंधीत माळ आहे
पाठीवरून त्यांचे संपृक्त हे गळाले
आहेत हे मनाचे सारेच 'कां' अतृप्त
डोळ्यातल्या जळाला ओठात हे कळाले
सारे कसे सुखाचे रेशीमगान गाती
मी छेडता तराणे अश्रूच का ढळाले
बोलून घे तरीही त्यांना असो निराशा
मार्गात ते अडूनी सांगा कसे वळाले
गोळा करीत आलो संगे सवंगडी मी
अंतीम या क्षणाला सारे कुठे पळाले
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/०६/२०११)
मस्त आहे आवड्ली
सुंदर
नाहि आवडली ... प्रयत्न छान
आवडली. सारे तुझेच होते झोळीत
वा वा वा
वृत्तात लिहीण्याचा प्रयत्न
:)
अंतीम क्षण (गझल)
क्या बात..क्या बात..क्या
सर्व