गंधासवे श्वास पुलकीत होती..
उरी मोगर्याचे उसासे.. नव्याने!
"आषाढ येईल लवकर तसाही.."
निवळत्या धरेला दिलासे नव्याने!
नको तेच पुन्हा-पुन्हा का दिसावे?
(कशाला जुने दु:ख सलते नव्याने?)
जाणिव नाही कशी जाणिवेला..
अवचित पुन्हा भास होती नव्याने!
पणतीस नाही तमा काळोखाची..
तमाचीच काया उजळते नव्याने!
अरे..कल्पनांचे खुजे विश्व माझे..
शब्दांस स्वरसाज चढती नव्याने
राघव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4009
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर गझल... अवांतर :
तम.= अंधार.. पणतीच्या
In reply to सुंदर गझल... अवांतर : by गणेशा
हाय हाय हाय
पणतीस नाही तमा
एकच अनुभव नव्याने येण्याचे
येस्स !
In reply to एकच अनुभव नव्याने येण्याचे by राजेश घासकडवी
काय राघव राव!! बरेच दिसांनी
सुंदर गझल..
खुपच
तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक
आवडली.
मस्तं
सुंदर रचना!
पुनःश्च धन्यवाद! राघव
छान..