✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दृष्टीआड

अ — अज्ञातकुल, Fri, 05/20/2011 - 04:17
दृष्टीआडच्या बोलण्या-प्रतिसादावरून त्यांचं खळखळतं व्यक्तिमत्व एकमेकांच्या गंमतीशीर फिरक्या घेतंय असंच वाटलं असतं कुणालाही..................... मात्र, त्या अवखळामागे दडली होती त्यांची अव्यक्त संपृक्त संवेदना आणि गुदमरलेल्या संवेदनेपाठची जुळी वेदना.......... अगतिक......हतबल....चंचल........ रिक्तातील कल्पना,..... अव्याहत,..... वास्तवातले अपेक्षाभंग तुडवत, आयुष्याला, मनस्वी....स्वप्नमय......मुग्धगात्र करू पहात होत्या................ आवाजातला मधुतम अंदाज श्वासांतला चिरसंध अश्वास श्रवणातला हवाहवासा दृढविश्वास साकारत होता त्यांच्यात एक रंजक-रंजित-मयरत-रसाळ-मेघाळ-मधाळ नीरव-एकांत-शांत-संथ दुष्यंत सहवास................... भेटीची ओढ आणि एकरूपतेची उत्प्रेक्षा हसण्यातून खिदळत असली तरी वळचणीतला कोमल गंधार शृतींवरचा त्याचा प्रभाव लपवू शकत नव्हता............... पलिकडल्या गच्च अंधारात तरंगत होते दोघांचेही संसार-संस्कार......... सोबत,......... आसक्त-अतृप्त-आतर्क्य-अटळ जन्मालंकार............................... !!! .............अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1195 वाचन

💬 प्रतिसाद (3)

अवघड शब्दांची बांधणी त्यामुळे आशय भरकटला.

दत्ता काळे
Fri, 05/20/2011 - 05:53 नवीन
आशय जरासा कळाला पण सगळे शब्द नाही कळाले. वळचणीतला कोमल गंधार म्हणजे नक्की काय ते कळाले नाही.
  • Log in or register to post comments

कोमल गंधार

अज्ञातकुल
Fri, 05/20/2011 - 07:04 नवीन
गंधार म्हणजे सारेगामा मधला "ग" हा स्वर त्याचा खालचा स्वर "रे" कडे झुकला की त्याला "कोमल गंधार" असे म्हणतात. असा लागलेला स्वर (रे,ग,ध,नी हे स्वर कोमल होऊ शकतात) हा मनात हुरहुर/अस्वस्थता निर्माण करतात. वळचणीतला कोमल गंधार म्हणजे "अंतरमनातली हुरहुर"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे

भरभरून घेतला...

अरुण मनोहर
Sun, 05/22/2011 - 10:32 नवीन
श्वासांतला चिरसंध अश्वास
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा