[पेग घ्यायची ओढ लागली]
पाषाणभेदाची क्षमा मागून
एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे.
[पेग घ्यायची ओढ लागली]
नकोच आता दुर सुराही
पेग घ्यायची ओढ लागली ||१||
पत्ते वाटा बसू गच्चीवर
नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२||
ओळखीच्यांना उधार दिली
माज करत ती सांडवत नेली ||३||
वायू परिचीत नाकास लागला
टुरटुर आवाज देवूनी गेला ||४||
नजरेच्या टापूत आले समोर
मारून फेकले लाटणे तोवर ||५||
पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली
जुन्या उधारीची आठवण आली ||६||
गेमच कसला असला नसता
मुकाट पत्ते पिसणे आता ||७||
पेगही पुरले भेळही सरली
'आत' जायची ओढ लागली ||८||
वाचने
2321
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
प्रतिक्रिया
सकाळी सकाळी????????
:(
रात्रभर प्यायल्यावर ओढ सकाळीच लागायची. :)
निनाव-
गेमच कसला असला नसता
मुकाट पत्ते पिसणे आता ||७||
पेगही पुरले भेळही सरली
'आत' जायची ओढ लागली ||८||
छान .चव मस्त वाटली !!
पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||या पामरास अर्थ बोध झाला नाही.
खरोखर 'एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन'
अतिशय हा शब्द विसरलात का?
खरोखर 'एक अतिशय टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन' हे योग्य वाटते.
तुम्ही जिंकले आहे हेल्मेट!


कविता वाचुन आता....घ्यावा म्हणतो एक छोटासा...
अरे आमचे तर लक्षच नाही असल्या प्रकारांकडे!
छान!
पेग घ्यायची ओढ लागली