Skip to main content

भेट घ्यायची ओढ लागली

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 20/04/2011 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
भेट घ्यायची ओढ लागली

नकोच आता दुर जराही भेट घ्यायची ओढ लागली ||१|| हिरव्या वाटा उंच तरूवर प्रकाशाचे किरण त्यावर ||२|| ओळखीच्या त्या झाडे वेली नेहमीची त्यांनी जादू केली ||३|| वायू परिचीत पानांस लागला थरथर त्यांना देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर शांत नितळ शितल सरोवर ||५|| हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली जुन्या स्मृतींची आठवण आली ||६|| विरह कसला असला नसता नकोच ते दुर असणे आता ||७|| श्रम पुरले वेळही सरली भेट घ्यायची ओढ लागली ||८|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०४/२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1929
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

नि:शब्द!!