Skip to main content

जा हसत दूर जा

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 05/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको जा हसत दूर जा त्रासलेला तुझा होकार नको घाव घातलेल्या ओंडक्यासम ह्रदयावर प्रेमाचा पुन्हा नवा अंकुर नको जा हसत दूर जा सोडणार्‍या साथीचा आधार नको परत परतण्याचा विचार नको ह्रदयावर नवीन वार नको जा हसत दूर जा मनाशी आता कुठला ही धागा नको तुटणार्‍या या नात्याला आशेचा आणखीन एक बंध नको जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको ---- शब्दमेघ
लेखनविषय:

वाचने 1504
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

लय भारी ओ पावनं!! जा हसत दूर जा सोडणार्‍या साथीचा आधार नको परत परतण्याचा विचार नको ह्रदयावर नवीन वार नको हे तर खासचं!!

एक नंबर रे...खुप आवडली....