शत्रु समोरून थेट वार करुन गेला -
शत्रु समोरून थेट वार करुन गेला -
मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला !
मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला
सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला !
सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला -
तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला !
पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला ,
अवसेला काजवाच चकित करुन गेला !
भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला
सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !
वाचने
1881
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
आवडली.
In reply to छान कविता आहे. by वेताळ
मला पण!
>>
पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला ,
अवसेला काजवाच चकित करुन गेला>>व्वा काय कल्पना आहे !कविता मस्तच जमुन आलीये !
चान चान !
छान
कविता आवडली...
छान कविता आहे.