मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रलय

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रलय निनादतो शंख कुणाचा डमडमतो डमरू संगे महारुद्राने का उघडला तिसरा नेत्र नि:संगे विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे पसरतो पंख तमाचा घणघणतो मृदुंग संगे कालाग्नी का चेतवला भाजूनी आकाशछत्र दुभंगे ढळतो पंथ पृथ्वीचा धडधडतो उल्काप्रपात संगे हलाहल तो पचवलेला कंठही लालीत आज रंगे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१७/०३/२०११)

वाचने 4745 वाचनखूण प्रतिक्रिया 14

पण आज इतके काही विशेष झाले नाही. (म्हणजे प्रलय वगेरे म्हणण्या एवढे) झुरळे झाली की बेगॉन मारावेच लागते आणि ते संपले तर पॅरागॉन असतेच ना जवळ? पैजारबुवा,