गण: देव गौरीनंदन आधी वंदुया
(चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||
रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी
तुज पुजीतो कलावंत आम्ही
मंगल कार्याआधी
गणाला गावूया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||२||
देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०३/२०११
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1244
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाशानभेदा -खूप छान - रसीक
पा भे. गाऊन दाखवा प्लिज. छान
मी अन गावून दाखवू? काय चेष्टा
In reply to पा भे. गाऊन दाखवा प्लिज. छान by प्राजु