नेहमीसारखेच - १
नेहमीसारखेच - १
आजही तिला छान जमलेली कविता दिली वाचायला....
अगदी नेहमीसारखेच.....
आजही तिने वाचून प्रेमाने विचारले मला.....
अगदी नेहमीसारखेच....
कसे जमते तुला रे.....
इतके सुंदर शब्द...
इतक्या छान उपमा...
मनाचा ठाव घेणारी लय...
अंत:करणाला थेट भिडणा-या भावना...
तू आणतोस तरी कुठून रे...
काय उत्तर देऊ....विचार करतोय...
खर तर हे प्रश्नच निरर्थक आहेत...
हो खरंच निरर्थक आहेत...
मी तर... मी तर फक्त तिला कागदावर उतरवत होतो....
नेहमीसारखेच... अगदी नेहमीसारखेच...
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०४/०३/२०११)
प्रेमकाव्य आवडले मनापासुन ..
तूसी छा गये
ह्म्म्म
छान ...
आवडली!
धन्यु
नेहमीसारखेच - १ ही खूप