Skip to main content

माझी गाव भेट

लेखक निनाव यांनी रविवार, 27/02/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
आहे परवाचीच गोष्ट जाऊन आलो गावा यावे चार दिवस राहून विचार असा झाला बायको पोर होते सोबत आणि घेतली होती तिकीट.अ पिशव्या होत्या हातात तिच्या माझ्या, आठवणींची होती ब्याग.अ पोहोचताच, गावाची मारून फेरी निजलो औदुंबर खाली येताच झुळूक वार्याची विलक्षण अनुभूती झाली मग, ज्यांचे होते पत्ते भेटलो त्यांना जाऊन जे होते हारवले त्यांना डोळे लावून बदलही जाणविले थोडे... झाले होते मातीचे डांबर झाले होते शेणाचे सिमेंट वाढले होते वय झाडांचे , मात्र पोर-खेळ होते तसेच आलो भेटून सर्वांना पोरांना गोधडया मिळाल्या पिशव्या झाल्या होत्या रिकाम्या मात्र ब्यागा तश्याच परतल्या..
लेखनविषय:

वाचने 1274
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

अजून येऊ दे........! ''पोरांना गोदडया मिळाल्या'' हे काही कळले नाही राव.....! :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डीडी सह्याद्री वाहीणीवर तुम्ही " आजीची गोधडी" ही अप्रतिम मालिका बघत जा म्हणुन .. आता कसं कळेल ? :) अवांतर : गाव कंच म्हणायचं तुमचं ? -बोक्या सातबंडे

डॉकः दुरुस्ती केली आहे. निदर्शनास आणल्या बद्दल धन्यवाद. - आ. निनाव.

गोधडीच्या येव्हड्या चिन्ध्या करु नका