Skip to main content

याहो याहो पाव्हणं तुम्ही

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/02/2011 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
याहो याहो पाव्हणं तुम्ही
याहो याहो पाव्हणं तुम्ही जरा जवळ बसा
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||धृ||

दिवसा र्‍हाती तुमची घाई
जरा बोलाया वेळच न्हाई
कसं व्हाव मग मन मोकळं
नका वेळ वाया घालू फुका
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||१||

मी बाई राही एकटी घरात
दिस सरून जाई सरेना रात
सोबतीला तुम्ही याहो
तग धरला कसाबसा
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||२||

थोडं मी बोलते थोडं तुम्ही बोला
दिसभराची ख्याली विचारा
रात आपलीच आहे विसरू नका
माझ्या जीवाची उलघाल जरा तुम्ही पुसा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०२/२०११

काव्यरस

वाचने 1004
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

पाशांभेदा -किती दिवसांनी ...?
दिवसा र्‍हाती तुमची घाई
जरा बोलाया वेळच न्हाई
कसं व्हाव मग मन मोकळं
नका वेळ वाया घालू फुका
देरसे आये दुरुस्त आये. मस्त !!