Skip to main content

मैत्रीचे गणित -

लेखक विदेश यांनी रविवार, 13/02/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!
काव्यरस

वाचने 1454
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे
मस्त. नाहीतरी मुक्ती कोनाला हवी आहे इथे ? गुरफटलेला णकु.

मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार वा ...मस्त !!