Skip to main content

अभंगः विठ्ठल उभा विटेवरी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 06/11/2010 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
अभंगः विठ्ठल उभा विटेवरी
विठ्ठल उभा विटेवरी भक्ताचीये वाट पाही ||धृ|| पुंडलीक लावी भक्तां मार्गा कर्म करण्या सोडी योगा तरची पावें प्रेमे देवा विठ्ठल पुंडलीक एकची राही ||१|| नामजप करता विठ्ठल अवघे हरपले भान कोण विठ्ठल कोण भक्त दोन ब्रम्ह वेगळे नाही ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०६/११/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2530
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अभंग आवडला. अवांतर- वॉशिंग्टनच्या विठोबाचे आगमन आणि आपला अभंग, योग जुळून आलाय.!

दुसरे कडवे आवडले. :)