Skip to main content

मनसे गीत

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/09/2010 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे गीत

मनसेचे सैनीक आम्ही....हो हो हो आम्ही मराठीसाठी लढणार हिंदूस्थानी राहूनहीहो आम्ही मराठीपण जपणार ||धृ|| कितीक नडले त्यांना भरडू कितीक चिडले त्यांना चिरडू आडवे आले त्यांना कापून काढू आम्ही शरण कुणा न जाणार ||१|| महाराष्ट्र नवनिर्मीण्या पुढे सरसावू समृद्धी अन विकास पाहू महाराष्ट्र अन मराठी असे ध्येय आमुचे आम्ही मराठी भाषा वैभवासी नेणार ||२|| विविध जाती, पंथ निराळे धर्म वेगळा, वर्ग निराळे मनसेच्या ध्वजाखाली एकत्र करणार आम्ही महाराष्ट्र नवनिर्मीणार ||३|| असो कुणी हिंदू वा असो कुणी मुस्लीम राहो कुणी बौद्ध वा राहो कुणी ख्रिश्चन जात न मानू आम्ही धर्म न कोणता मानू आम्ही सारे मराठीचे मुले होणार ||४|| समस्या असोत कितीही आम्ही सोडवू मराठी आड कोण येई त्यांना फोडू नवरचना करण्या, संघर्ष करण्या आम्ही हाती हात धरून कामे करणार ||५|| - पाषाणभेद (दगडफोड्या) मनसे सैनीक २९/०९/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3222
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

झकास :)

In reply to by इंटरनेटस्नेही

इंस्ने, तुला ज्या अर्थी नक्कल वाटते त्या अर्थी तू हे गीत गावून म्हटले आहे असे वाटते. जरा चाल सांग म्हणजे लगेचच आपल्याला समजेल की चाल सारखी आहे की वेगळी. अरे, शिवसेना अन मनसेचे वैर त्यांच्यापाशीच राहू दे. आपण सामान्य कार्यकर्ते आहोत, सतरंज्या उचलणारे! तू तू मी मी सोडून गाण्याचा आस्वाद घे फक्त. :-) अवांतर: अभ्यास चालू आहे की नाही बाबा?

लई भारी!!! झक्कास !!@!!

In reply to by आमोद शिंदे

कसा आणि कुठे मराठीला काळीमा फासला मनसेने? कृपया सांगाल का? नाही म्हणजे सांगाच हा आग्रह आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मनसे ला कविता जरुर पाठवा.......! सगळ्यांच्या प्रतीसादासहित (विशेष करून आमच्या प्रतिसदासाहित) मनसेचे मांस किलो किलोने वाढेल.