आयुष्यातील वळणे....

अथांग जे न देखे रवी...
आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही नाती ओली-हळवी- काही फक्तं दळणॆ ! कित्ती सारे मोसम आलेले, भोगलेले, क्वचित – उपभोगलेले... काही फुले फुललेली तनात – काही करपून गेलेले ! तरी पण पुढच्या क्षणात, क्षणातील एक-एक कणात... खूप काही जपण्याचे – पण मनातल्या मनात ! आयुष्यातील वळणे, कधी पाऊस, कधी जळणे... काही कोडी सुटल्यासारखी, अन.. काही कधीच न कळणे... कधीच न कळणे !!!
वर्गीकरण
लेखनविषय:

3 टिप्पण्या 1,406 दृश्ये

Comments